Sameer Panditrao
विमानात असणारी ‘फ्युएल स्विच’ अर्थात इंधन स्विच ‘ऑन-ऑफ’ करणारी यंत्रणा इंधनाचा प्रवाह नियंत्रित करते.
या ‘स्विच’ना दोन स्थिती असतात. त्याला ‘रन’ आणि ‘कट ऑफ’ असे म्हणतात. इंजिन सुरू किंवा बंद करण्यासाठी त्या वापरल्या जातात.
स्विच’च्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या बाजूला ‘ब्रॅकेट’ देण्यात आलेले असतात. याबरोबरच एक ‘स्टॉप लॉक’ यंत्रणा देखील देण्यात आलेली असते.
वैमानिकांना स्विच त्याच्या ‘रन’ किंवा ‘कट ऑफ’ अशा कोणत्याही एका स्थितीवरून दुसऱ्या स्थितीत हलवण्यापूर्वी ‘स्टॉप लॉक’ यंत्रणा वापरून ते उचलावे लागते.
विमानातील इंधन ‘स्विच’चे मुख्य काम इंजिनमध्ये इंधन पोहोचवणे हे आहे.उड्डाणादरम्यान जर एखादे इंजिन काम करणे थांबले, तर पायलट या ‘स्विच’चा वापर करून दुसरे इंजिन सुरू करतात.
विमानात ‘थ्रस्ट लिव्हर्स’ची महत्त्वाची भूमिका असते. वैमानिकाकडून इंजिनाला पुरविण्यात येणाऱ्या इंधनाच्या प्रमाणाला नियंत्रित करणारा हा घट असून, इंजिनची शक्ती नियंत्रित करण्याचे काम ते करते.
अपघातग्रस्त विमानाच्या दोन्ही इंजिनांचे इंधन ‘स्विच’ एक सेकंदाच्या अंतराने ‘कट ऑफ’ करण्यात आले आणि नंतर पुन्हा चालू करण्यात आले, असे सकृतदर्शनी दिसते.