Sameer Panditrao
भारत-पाकिस्तान संघर्षामध्ये सीमाभागांतील नागरिकांनी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा अनुभव घेतला. काश्मीरच्या विविध भागांमध्ये हे ड्रोन सक्रिय होते.
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या देशांनी यापूर्वी दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी ड्रोनचा वापर केला आहे.
ड्रोन युद्धामध्ये मानवरहित किंवा दूरस्थपणे नियंत्रित उपकरणांचा वापर केला जातो. या ड्रोनची हवेत, जमिनीवर, समुद्रपातळीवर किंवा पाण्याखाली टिकून राहण्याची क्षमता आहे.
काही ड्रोन मॅन्युअल नियंत्रणाद्वारे चालवले जातात, तर काही मिशनसाठी ऑटो-पायलट प्रणालीचा वापर करतात.
सैन्याच्या वापरासाठी वापण्यात येणाऱ्या ड्रोनचे वजन २५ किलो आणि त्यापुढे असते.
तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाल्यामुळे ड्रोन अधिक कार्यक्षम झाले. त्यांचा मुख्य उपयोग गुप्त माहिती गोळा करणे आणि दूरच्या अंतरावरून एखादे लक्ष्य नष्ट करणे असाच राहिला आहे.
मानवरहित उपकरांमुळे प्रत्यक्ष सैनिकांचे प्राण वाचवणे शक्य झाले. युक्रेन युद्धाने या तंत्रज्ञानाच्या वापरात खऱ्या अर्थाने क्रांती घडवली.