Akshata Chhatre
भारताविरुद्ध झालेल्या युद्धांत १९४७, १९६५ आणि १९९९ मध्ये पाकिस्तान पराभूत झाला.पण त्यांच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर दिसतात अनेक पदकं… का?
प्रत्येक देश वीरता, सेवा आणि सहभागासाठी सैन्याला पदकं देतो. जिंकलेल्या युद्धासाठीच नाही, हाताळलेल्या ऑपरेशन्ससाठी सैन्यांचा गौरव केला जातो.
पाकिस्तानने आपल्या सैनिकांना १९४८, १९६५, १९७१ युद्धांसाठी आणि सियाचिन, बलुचिस्तान वादांतील कारवायांसाठी पदकं दिली आहेत.
देशांतर्गत ऑपरेशन्स, शांतता काळातील सेवा, आणि विशेष प्रशिक्षणासाठी पदकं देणं ही सामान्य प्रक्रिया आहे.
हिलाल-ए-जुर्रत, सितारा-ए-जुर्रत, तमगा-ए-जुर्रत आणि इम्तियाजी सनद ही पाकिस्तान सैन्यातील काही वीरता पदकं आहेत.
केवळ युद्धातील कार्यासाठीच नाही तर देशांतर्गत होणाऱ्या वेगवेगळ्या कारवाया तसंच सेवेसाठी सैन्याला ही पदकं दिली जातात.