गोमन्तक डिजिटल टीम
आज दिवाळीचा पहिला दिवस. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, अंधारावर मात करणारा.
गोव्यातल्या गावांमध्ये दिवाळीची एक वेगळीच झलक पाहायला मिळते. पहाटे सुरु झालेला पक्षांचा किलबिलाट आणि नरकासुर दहनाची गडबड.
पहाटेच्या पुसट उजेडात जळणारा नरकासुर आणि त्यांनतर अभ्यंग स्नानाची तयारी.
दिवस डोक्यावर येऊ लागताच घराघरातून फराळ आणि पोह्यांचा वास दरवळू लागतो, श्रीकृष्णाच्या आरतीचे सूर निघतात.
आजूबाजूच्या घरांमध्ये जाऊन दिवाळीच्या मनभरून शुभेच्छा दिल्या जातात. पोह्यांचा आस्वाद घेतला जातो.
कितीही वाद असले तरीही लोकं एकत्र येतात, गप्पा करतात, हसतात, आनंद साजरा करतात. कदाचित सणांची हीच खरी ओळख असेल. गोव्यात असला तर एखाद्या गावात नकीच जाऊन या. गावातल्या दिवाळीचं रूप पाहून या!!