Hotel Style Mutton Biryani: हॉटेलसारखी मटण बिर्याणी आता घरीच बनवा! मटण मऊ, भात सुटसुटीत अन् अप्रतिम चव; जाणून घ्या रेसिपी

Sameer Amunekar

मटण स्वच्छ धुऊन घ्या

सर्वप्रथम मटण स्वच्छ धुऊन घ्या. बिर्याणीसाठी मटणाचे मध्यम आकाराचे तुकडे घ्या. यामुळे मटण शिजायला आणि मसाला मुरायला मदत होते.

Hotel Style Mutton Biryani | Dainik Gomantak

मटणाला मसाले लावून मॅरिनेट करा

मटणात दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला, मीठ आणि लिंबाचा रस घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून किमान 1 तास मॅरिनेट करा.

Hotel Style Mutton Biryani | Dainik Gomantak

कांदा सोनेरी रंगाचा तळून घ्या

कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत तळा. थोडा कांदा बिर्याणी सजवण्यासाठी बाजूला ठेवा.

Hotel Style Mutton Biryani | Dainik Gomantak

मटण मसाल्यासह चांगले शिजवा

तळलेल्या कांद्यात मॅरिनेट केलेले मटण घाला. त्यात हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मटण मऊ होईपर्यंत शिजवा.

Hotel Style Mutton Biryani | Dainik Gomantak

बासमती तांदूळ अर्धवट शिजवा

बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन 20 ते 30 मिनिटे भिजत ठेवा. उकळत्या पाण्यात मीठ, तमालपत्र, लवंग आणि वेलची घालून तांदूळ 70 टक्के शिजवा. नंतर पाणी काढून घ्या.

Hotel Style Mutton Biryani | Dainik Gomantak

मटण आणि भाताचे थर लावा

एका जाड बुडाच्या भांड्यात प्रथम मटणाचा थर लावा. त्यावर अर्धवट शिजवलेला भात पसरवा. वरून तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, तूप आणि केशरयुक्त दूध घाला.

Hotel Style Mutton Biryani | Dainik Gomantak

मंद आचेवर दम द्या

भांड्यावर झाकण ठेवून मंद आचेवर 20 ते 25 मिनिटे बिर्याणी दमवर शिजवा. त्यानंतर काही मिनिटे झाकण तसेच ठेवा. गरमागरम मटण बिर्याणी रायता आणि सलाडसोबत सर्व्ह करा.

Hotel Style Mutton Biryani | Dainik Gomantak

फटाक्यांच्या ठिणगीनं त्वचा भाजली तर काय करावे?

येथे क्लिक करा