Sameer Amunekar
फटाक्यांच्या ठिणगीमुळे त्वचा भाजल्यास त्वरित ती जागा साधारण 20 मिनिटे थंड वाहत्या पाण्याखाली धरा. यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते.
भाजलेल्या त्वचेवर थेट बर्फ लावू नका. त्यामुळे त्वचेला आणखी नुकसान होऊ शकते. थंड वाहते पाणी वापरणे अधिक योग्य आहे.
भाजलेल्या जागेवर टूथपेस्ट, तूप, तेल, हळद किंवा लोणी लावणे टाळा. यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो आणि जखम तपासणे कठीण होते.
भाजल्यामुळे त्वचेवर पाण्याचे फोड आल्यास ते फोडू नका. यामुळे संसर्ग होऊ शकतो आणि जखम बरी होण्यास वेळ लागू शकतो.
थंड पाण्याने जखम थंड केल्यानंतर स्वच्छ, न चिकटणाऱ्या ड्रेसिंगने किंवा निर्जंतुक गॉजने ती हलकेच झाका. जखमेवर घट्ट पट्टी बांधू नका.
त्वचेवर मोठे फोड आले असतील, त्वचा पांढरी किंवा काळी पडली असेल अथवा तीव्र वेदना होत असतील तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या. चेहरा, हात, पाय किंवा गुप्तांगांचा भाग भाजल्यासही डॉक्टरांचा सल्ला घ्या.
भाजलेली जागा लाल होणे, सूज येणे, पू येणे किंवा ताप येणे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जा. लहानशी जखम वाटली तरी तिची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.