Sameer Panditrao
होर्मुझची सामुद्रधुनी ही आशियाच्या मध्य पूर्व भागातील इराणच्या आखाताला ओमानच्या आखातासोबत जोडणारी एक अरुंद सामुद्रधुनी आहे.
इराणच्या आखाताला अरबी समुद्र व हिंदी महासागरासोबत जोडणारा हा एकमेव दुवा असून, ही सामुद्रधुनी जगातील सर्वांत महत्त्वाच्या सागरी स्थानांपैकी एक आहे.
पर्शियाच्या आखाताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश होतो.
इराणने आजवर कोणत्याही युद्धाच्या काळात होर्मुझ सामुद्रधुनी बंद केलेली नव्हती.
१९८०च्या दशकात इराण-इराक युद्धावेळी दोन्ही देशांनी सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले केले; पण वाहतूक थांबवलेली नव्हती.
इराण स्वतःच्या व्यापारासाठी या सामुद्रधुनीवर अवलंबून आहे. ती बंद राहिल्यास इराण आणि त्याच्या मित्रराष्ट्रांचेही नुकसान होणार आहे.
नियमांनुसार सामुद्रधुनीतील देशांना त्यांच्या किनारपट्टीपासून १२ नॉटिकल मैल अंतरापर्यंत ताबा ठेवता येतो. सामुद्रधुनी व शिपिंग लेन्स या पूर्णपणे इराण व ओमानच्या ताब्यातील जलभागात येतात.