Manish Jadhav
होंडाने प्रीमियम सेडान होंडा सिटीचे स्पोर्ट मॉडेल लॉन्च केले.
या नवीन होंडा सिटी स्पोर्ट एडिशनची किंमत 14.89 लाख रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरु होते. विशेष आकर्षणासाठी त्याच्या एक्सटीरियर आणि इंटीरियरमध्ये अनेक ब्लॅक-आउट भाग देण्यात आले आहेत.
कारच्या स्पोर्ट एडिशनमध्ये केवळ कॉस्मेटिक बदल दिसून येतील. फीचर्स आणि इंजिन पूर्वीसारखेच असणार आहेत.
होंडा सिटी स्पोर्ट एडिशनमध्ये कंपनीने इंजिन किंवा कोणत्याही मेकॅनिकल पार्टमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 1.5 लिटर आय-व्हीटीईसी पेट्रोल इंजिन मिळेल, जे 119 बीएचपी पॉवर आणि 145 एनएम टॉर्क देते.
तसेच, कारचे मायलेज देखील होंडा सिटीसारखेच असेल. मॅन्युअल व्हेरिएंटला 17.8 किमी/लीटर मायलेज मिळेल आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंटला 18.4 किमी/लीटर मायलेज मिळेल.
मात्र, होंडा सिटी स्पोर्ट एडिशनच्या डिझाइनमध्ये अनेक मोठे बदल दिसून येतात.