गोमन्तक डिजिटल टीम
देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती
देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होण्याचा मान नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना मिळाला आहे. प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर मुर्मू दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत.
विरोधात यशवंत सिन्हा
राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात जेष्ठ राजकिय नेते यशवंत सिन्हा उभे होते. मुर्मू यांना सिन्हा यांच्या तुलनेत 63 टक्के मते मिळाली आहेत.
सर्वात तरूण राष्ट्रपती
राष्ट्रपती मुर्मू या आजवर झालेल्या सर्वात तरूण राष्ट्रपती आहेत. देशाच्या 15 व्या राष्ट्रपती यांचे वय 64 वर्षे आहे. स्वांत्र्यानंतर जन्मलेल्या भारताला लाभलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
आजोबा आणि वडिल गावचे सरपंच
ओडिसा राज्यातील मयुरभंज या मागासवर्गीय जिल्ह्यात मुर्मू यांचा जन्म झाला. संथल या जमातीच्या असलेल्या मुर्मू यांचे आजोबा आणि वडिल गावचे सरपंच राहिले आहेत.
राजकारणात प्रवेश
भाजपच्या तिकीटावर मुर्मू रायरंगपूर मतदारसंघातून 2000 आणि 2004 साली आमदार म्हणून निवडून गेल्या.
झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल
ओडिसा राज्यात त्यांनी मार्च 2000 मे 2004 या कालावधीत मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून त्यांनी मे 2015 साली त्या विराजमान झाल्या. सहा वर्षे त्यांनी राज्यपाल म्हणून कार्यभार संभाळला.
सामाजिक कार्यात प्रवेश
राज्यपाल पदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले.
सुरूवातीला शिक्षिका म्हणून काम
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू सुरूवातील रायरंगपूर येथील श्री अरूबिन्दो इंटिग्रल एड्यूकेशन सेंटर येथे शिक्षिका म्हणून काम करत होत्या.
सहा वर्षात अनेक दुर्घटना
मुर्मू यांनी 2009 ते 2015 या सहा वर्षात आपले पती, दोन मुले, आई आणि भावाला गमावले. त्यानंतर त्या ब्रम्हकुमारीच्या साधक बनल्या व त्यातच स्वत:ला वाहून घेतले. त्यांची एकच मुलगी इतिश्री मुर्मू हयात असून ती डॉक्टर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.