Sameer Amunekar
केसांसाठी 'जादूई' काळे तेल बनवण्यासाठी मेथी दाणे, कलोंजी (काळे जिरे), तांदूळ आणि बदाम हे मुख्य घटक लागतात.
सर्व घटक कढईत मंद आचेवर पूर्णपणे काळे होईपर्यंत चांगले भाजून घ्यावेत.
भाजलेले मिश्रण खोबरेल किंवा बदामाच्या तेलात टाकून काही वेळ गरम करावे आणि नंतर ते तेल गाळून घ्यावे.
या तेलाच्या नियमित मसाजमुळे केसांच्या मुळांना खोलवर पोषण मिळते आणि केसगळती थांबण्यास मदत होते.
हे तेल टाळूवर लावल्याने विरळ झालेल्या ठिकाणी नवीन केस येण्यास (Regrowth) चालना मिळते.
हे तेल नियमित वापरल्याने अकाली पांढरे होणारे केस कमी होतात आणि केसांना नैसर्गिक काळी चमक येते.
हे तेल नैसर्गिक घटकांपासून बनलेले असल्याने याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत आणि ते सर्वांसाठी सुरक्षित आहे.