Beauty Tips: वयाला द्या लगाम! चेहऱ्यावर ग्लो हवाय? मग फॉलो करा 'या' 7 सोप्या स्टेप्स

Sameer Amunekar

हायड्रेशनवर भर द्या

वयानुसार त्वचेतील आर्द्रता कमी होऊ लागते. दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि त्वचा आतून हायड्रेटेड राहते.

Beauty Tips | Dainik Gomantak

सनस्क्रीनचा वापर

सूर्याची अतिनील किरणे अकाली वृद्धत्वासाठी सर्वात जास्त जबाबदार असतात. ढगाळ वातावरण असो किंवा घर, दिवसा सनस्क्रीन लावणे हा तरुण दिसण्याचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे.

Beauty Tips | Dainik Gomantak

ॲन्टी-ऑक्सिडंटयुक्त आहार

तुमच्या आहारात रताळे, पालक, बेरीज, नट्स आणि फळांचा समावेश करा. हे पदार्थ मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात आणि त्वचेला एक नैसर्गिक चमक देतात.

Beauty Tips | Dainik Gomantak

नियमित 'फेस मसाज'

दररोज रात्री किंवा सकाळी चेहऱ्याला कोमट खोबरेल तेल किंवा आलमंड ऑईलने हलक्या हाताने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्याचे स्नायू टोन राहण्यास मदत होते.

Beauty Tips | Dainik Gomantak

स्किनकेअर रूटीन

दिवसभराची धूळ आणि प्रदूषण साफ करण्यासाठी 'डबल क्लिनसिंग' करा. मेकअप असो वा नसो, रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ करून एखादे चांगल्या प्रतीचे नाईट क्रीम किंवा सीरम नक्की लावा.

Beauty Tips | Dainik Gomantak

पुरेशी झोप

रात्रीची ७-८ तासांची गाढ झोप ही तुमच्या त्वचेची 'रिपेअर सिस्टम' असते. झोप पूर्ण न झाल्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावर थकवा दिसू लागतो. वेळेवर झोपल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

Beauty Tips | Dainik Gomantak

'या' अन्नापासून दूर राहा

जास्त साखर खाल्ल्याने त्वचेतील कोलेजन कमी होते, ज्यामुळे त्वचेचा लवचिकपणा कमी होऊन सुरकुत्या पडू शकतात. साखरेचे प्रमाण कमी केल्यास त्वचेवरचा तजेलदारपणा अधिक टिकून राहतो.

Beauty Tips | Dainik Gomantak

इनडोअर प्लांट्स मरण्यापासून वाचवण्यासाठी 'हे' उपाय करा

Plant Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा