Pink Cheeks Naturally: हिमालयातील मुलींच्या गुलाबी गालांसारखा ग्लो हवाय? 'या' 7 नैसर्गिक टिप्स ठेवा लक्षात

Sameer Amunekar

भरपूर पाणी प्या

त्वचेची नैसर्गिक चमक टिकवण्यासाठी शरीर हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे. दिवसभर नियमितपणे पाणी प्या आणि काकडी, कलिंगड, संत्री यांसारखे पाण्याचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ आहारात घ्या.

Natural Tips for Rosy Cheeks | Dainik Gomantak

फळे-भाज्या

व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. हिरव्या भाज्या, बेरी, सिट्रस फळे, कडधान्ये, नट्स आणि बिया यांचा संतुलित आहारात समावेश करा.

Natural Tips for Rosy Cheeks | Dainik Gomantak

सनस्क्रीन

सूर्याच्या UV किरणांमुळे टॅनिंग, पिग्मेंटेशन आणि त्वचेचे अकाली वृद्धत्व होऊ शकते. त्यामुळे सकाळी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे आहे.

Natural Tips for Rosy Cheeks | Dainik Gomantak

चेहरा सौम्य पद्धतीने स्वच्छ करा

धूळ, घाम आणि अतिरिक्त तेल त्वचेवर साचल्याने त्वचा निस्तेज दिसू शकते. मात्र वारंवार किंवा खूप जोरात चेहरा घासणे टाळा. त्वचेच्या प्रकारानुसार सौम्य क्लिंझर वापरा.

Natural Tips for Rosy Cheeks | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर वापरा

त्वचा कोरडी असो किंवा ऑयली, योग्य मॉइश्चरायझर त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत करतो. ऑयली त्वचेसाठी हलका जेल-बेस्ड, तर कोरड्या त्वचेसाठी अधिक हायड्रेटिंग मॉइश्चरायझर निवडा.

Natural Tips for Rosy Cheeks | Dainik Gomantak

झोप, व्यायामाकडे लक्ष द्या

पुरेशी झोप आणि नियमित शारीरिक हालचाल शरीरासोबतच त्वचेच्या आरोग्यासाठीही महत्त्वाची आहे. झोपेची कमतरता आणि ताण त्वचा निस्तेज दिसण्यास कारणीभूत ठरू शकतात.

Natural Tips for Rosy Cheeks | Dainik Gomantak

नैसर्गिक रंग

हिमालयातील मुलींसारखे गाल दिसावेत म्हणून त्वचेचा नैसर्गिक रंग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा निरोगी, हायड्रेटेड आणि समसमान दिसणारी त्वचा हे लक्ष्य ठेवा.

Natural Tips for Rosy Cheeks | Dainik Gomantak

चेहऱ्यावर शीट मास्क लावल्यानं खरंच ग्लो येतो?

येथे क्लिक करा