Akshata Chhatre
उन्हाळ्यात डॅन्ड्रफचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे? सतत डोक्यात पडणारी खाज यामुळे कंटाळला आहात ना? आज जाणून घेऊया काही नैसर्गिक पण प्रभावी उपाय.
लिंबामुळे त्वचेचा pH संतुलित राहतो. आठवड्यातून एकदा २ चमचे लिंबाचा रस + कोमट पाणी असे मिश्रण टाळूवर लावून १० मिनिटांनी धुवा
खोबरेल तेल तुमच्या केसांना पोषण देतं, कापूर खाज कमी करतो. त्यामुळे थोडा कापूर कोमट खोबरेल तेलात मिसळा रात्रभर टाळूवर लावून ठेवा आणि सकाळी केस धुवा.
बॅक्टेरिया व फंगल संसर्गावर रामबाण उपाय म्हणजे दही आणि मध. २ चमचे दही + १ चमचा मध टाळूवर लावा, ३० मिनिटांनी धुवा
कोरफड टाळूला थंडावा देते, सोबतच खवले व खाज कमी करते. ताजं अलोवेरा जेल टाळूवर लावा आणि २० मिनिटांनी धुवून टाका
अँटीऑक्सिडंट्स टाळूचं आरोग्य राखतात. त्यामुळे ग्रीन टी उकळा आणि काही काळ थंड होऊ द्या याचा शेवटी केस धुताना रिन्स म्हणून वापर करा