Akshata Chhatre
शरीराला अनेक आजारांनी ग्रासलेलं असतं आणि आपण दरवेळी डॉक्टरकडे धाव घेतो.
लिंबू हा पचनाला मदत करतो, मंदावलेला अग्नी पुन्हा जागृत करतो.
मात्र आज आम्ही तुम्हाला पोटदुखी, पोटफुगी यांसारख्या त्रासावर कायमचा आणि सोपा उपाय सुचवणार आहोत.
अपचनामुळे पोट दुखत असल्यास आलं आणि लिंबाचा रस व मध यांचे एकत्र सेवन केल्यास त्रास कमी होतो.
भूक लागत नसली, पोट जड वाटत असलं तर लिंबू आडवा कापून तयावर काळे मीठ, जिरे , हळद आणि हिंग असे मिश्रण तयार करून लिंबाच्या रसासोबत घ्यावे.
लिंबाच्या साली सुकवून त्याची राख करून घ्यावी, ही राख आणि मध असे मिश्रण घेतलास उलटी थांबते.
तर मग आता छोट्या छोट्या आजारांसाठी डॉक्टरांकडे नाही तर स्वतःच्या घरात नीट झाकून पहा.