Sameer Amunekar
लिंबातील नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म टॅनिंग कमी करतात, तर मध त्वचेला मॉइश्चर देतो. दोन्ही मिसळून 10–15 मिनिटे लावा आणि कोमट पाण्याने धुवा.
दही त्वचा मऊ करते, हळद डाग-टॅनिंग कमी करते. 2 चमचे दह्यात चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी धुवा.
कोरफड जेल रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा. हे टॅनिंग कमी करून त्वचेला नैसर्गिक चमक देते.
टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. ताजा रस चेहऱ्यावर लावा, 10 मिनिटांनी धुवा. त्वचा उजळ दिसू लागते.
बेसन मृत त्वचा काढून टाकते. बेसनात दूध मिसळून पॅक तयार करा, सुकल्यावर हलक्या हाताने घासून धुवा.
काकडी त्वचेला थंडावा देते व टॅनिंग कमी करते. काकडीचा रस कापसाने चेहऱ्यावर लावा.
दररोज झोपण्यापूर्वी गुलाबपाणी लावल्यास त्वचा फ्रेश, उजळ आणि चमकदार दिसते.