Sameer Amunekar
प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात, महाबळेश्वरपासून सुमारे २४ किमी अंतरावर वसलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५६ साली किल्ल्याची उभारणी केली.
इ.स. १६५९ मध्ये झालेल्या ऐतिहासिक प्रतापगडाच्या युद्धात शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा पराभव केला.
किल्ला दोन भागांत विभागलेला आहे. बालेकिल्ला आणि खालचा किल्ला, जे लष्करी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते.
किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर असून शिवाजी महाराजांची ती कुलदेवता मानली जाते.
किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे, जो पर्यटकांचे आकर्षण आहे.
निसर्गसौंदर्य, इतिहास आणि ट्रेकिंगसाठी प्रतापगड किल्ला पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.