Akshata Chhatre
भारतात साधारण सव्वातीनशे जातींचे साप सापडतात. त्यापैकी जमिनीवरील 40 व पाण्यातील 30 जाती विषारी आहेत.
बऱ्याच वेळा सर्पदंश हा बिनविषारी असतो, त्यामुळे कित्येक वेळा साप चावला या भीतीपोटीच माणूस दगावतो.
बिनविषारी साप चावल्यास चावलेल्या दातांच्या खुणा बऱ्याच व रांगेत दिसतात. चावलेल्या जागेतून द्रव जास्त वाहत नाही. चावलेली जागा काळी-निळी होत नाही. चावलेल्या जागी खूप सूज येत नाही.
विषारी साप चावल्यास एक-दोन दातांच्याच चावल्याच्या खुणा दिसतात. चावलेल्या जागेतून द्रव किंवा रक्त वाहते. चावलेली जागी काळी-निळी होते. चावलेल्या जागी खूप सूज येते.
रुग्णास शांत, उताणे खाटेवर झोपवून त्याच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा. सर्पदंश झालेला भाग म्हणजे हात किंवा पाय हृदयाच्या बरोबर किंवा खालच्या पातळीवर ठेवावा. सर्पदंशाच्या वरच्या बाजूला पाच ते दहा सेंटिमीटर अंतरावर घट्ट पट्टी बांधावी. मात्र त्यातून निदान एक बोट आत सरकू शकेल इतपतच ती घट्ट असावी. ती सांध्यावर बांधू नये.
जिथे साप चावला तेथे निर्जंतुक ब्लेडच्या साह्याने दोन-तीन सेंटिमीटर लांबीच्या उभ्या चिरा घ्याव्यात. त्यातून अर्धा तास रक्त वाहू द्यावे. जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी न्यावे. वेळेत उपचार सुरू झाले तर विषारी साप चावल्यावरही रुग्ण वाचू शकतो.