Akshata Chhatre
डोकेदुखी ही केवळ तात्पुरती शारीरिक त्रासदायक बाब नसून, ती शरीराच्या आत सुरू असलेल्या असंतुलनाचं लक्षण असू शकते.
रोज डोकेदुखी होत असल्यास, ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही. या त्रासामागे अनेक कारणं असू शकतात.
जसं की डोळ्यांवरील ताण, अन्न न पचणे, मानसिक तणाव, झोपेची कमतरता किंवा शरीरातील पाण्याची कमी
बाजारात मिळणाऱ्या वेदनाशामक औषधांनी तात्पुरता आराम मिळतो, पण ते दीर्घकालीन उपाय ठरत नाहीत. म्हणूनच, घरगुती उपाय अधिक सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय ठरतात.
आल्याचा चहा डोकेदुखीवर प्रभावी असतो. यातील अँटी-इन्फ्लेमेटरी घटक रक्ताभिसरण सुधारून मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य करतात.
पुदिन्याच्या तेलातील मेन्थॉल रक्तवाहिन्यांवर काम करून त्वरीत आराम देतो विशेषतः मायग्रेनमध्ये. याशिवाय, लिंबाच्या सालींची वाफ घेतल्यास सर्दीमुळे निर्माण झालेली डोकेदुखी कमी होते.