Sameer Amunekar
अॅसिडिटी झाल्यास एक ग्लास थंड दूध प्यावे. दूधातील कॅल्शियम आम्लाला त्वरित शांत करते.
जेवल्यानंतर १ चमचा बडीशेप चघळा किंवा गरम पाण्यात उकळवून त्याचा चहा प्या.
रोज सकाळी आवळा पावडर मधासोबत खाऊ शकता किंवा आवळ्याचा रस प्या.
एक चमचा जिरं भाजून पूड करा, आणि ती गरम पाण्यात मिसळून घ्या. हे पचन सुधारते आणि अॅसिडिटी कमी करते.
लिंबूपाणी शरीरातले आम्ल संतुलित करते. थोडे लिंबू पाणी प्या पण त्यात मिठ न घालू लका.
आलं थोडं चघळा किंवा आल्याचा चहा प्या. आल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अॅसिडिटी कमी होते.