Akshata Chhatre
कोथिंबिरीला येणारी फळं वाढली की त्याला धणे असं म्हणतात.
धण्याच्या पाण्याने पित्त वाढत नाही, तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर या उपाय चांगला आहे.
लघवीला जळजळ होत असली किंवा अडखळत असली तर धण्याचा काढा घेतल्याने उपयोग होतो.
धण्याचा काढा डोळ्यांसाठीही उत्तम असतो. डोळ्याची आग वैगरे होत असेल तर हा उपाय करू पहा.
धण्याचं पाणी पिल्याने अंगातील ताप कमी व्हायला मदत मिळते.
अनेकवेळा पाणी पिऊन तहान शमत नाही, याला तृष्णा असं म्हणतात यावेळी धण्याच्या पाण्यासोबत खडीसाखर खावी.
आपल्या घरच्या दवाखान्यात अनेक उपाय असतात आपण मात्र तिथे लक्ष देत नाही.