Sameer Amunekar
फेशियलची सुरुवात चेहऱ्याच्या स्वच्छतेने करा. एका वाटीत थोडे कच्चे दूध घेऊन कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ पुसून घ्या. दूध हे नैसर्गिक क्लिंजर आहे, जे त्वचेवरील धूळ आणि घाण काढून टाकते.
त्वचेवरील मृत पेशी (Dead Skin) काढण्यासाठी एक चमचा साखर आणि एक चमचा मध एकत्र करा. या मिश्रणाने चेहऱ्यावर हलक्या हाताने २ ते ३ मिनिटे मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
स्क्रबिंगनंतर चेहऱ्याला गरम पाण्याची वाफ (Steam) घ्या. वाफेमुळे चेहऱ्यावरील बंद झालेले रोमछिद्र (Pores) उघडतात आणि ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स सहज निघून जाण्यास मदत होते.
चेहऱ्याला ग्लो आणण्यासाठी मसाज करणे गरजेचे आहे. टोमॅटोचा रस आणि कोरफड जेल (Aloe Vera) एकत्र करून चेहऱ्यावर ५ मिनिटे खालून वरच्या दिशेने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
त्वचेचा रंग उजळवण्यासाठी २ चमचे बेसन, चिमूटभर हळद आणि थोडे दही एकत्र करून फेसपॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावून १५ मिनिटे सुकू द्या, मग थंड पाण्याने धुवा.
फेसपॅक धुतल्यानंतर उघडे झालेले रोमछिद्र बंद करण्यासाठी गुलाब पाणी (Rose Water) टोनर म्हणून वापरा. गुलाब पाणी चेहऱ्यावर स्प्रे करा किंवा कापसाने लावा, यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो.
फेशियलचा शेवटचा टप्पा म्हणजे मॉइश्चरायझर. त्वचेचा मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी नारळाच्या तेलाचे २ थेंब किंवा तुमचे नेहमीचे मॉइश्चरायझर चेहऱ्यावर लावून हलका मसाज करा.