Sameer Amunekar
रॉयल लुकसाठी चांगल्या रंगांचा वापर करा. जसं की नेव्ही ब्लू, मरून, डार्क ग्रीन किंवा रॉयल पर्पल. हे रंग भिंतींना एक क्लासिक आणि एलिगंट लुक देतात.
चंदेलियर, वॉल लाईट्स किंवा एंटिक स्टाईल टेबल लॅम्प्स वापरून घराला रॉयल टच देता येतो. गरम पिवळसर प्रकाश वातावरणात उबदारपणा आणि सौंदर्य निर्माण करतो.
लक्झरी आणि रॉयल लुकसाठी अँटीक किंवा व्हिंटेज लूक असणारं फर्निचर निवडा. ओक, टीक, किंवा सागवान लाकडाचे सोफे, डायनिंग टेबल आणि कपाटं घराला भव्यतेचा अनुभव देतात.
भिंतींवर मोठे आणि सुंदर फ्रेम असलेले आरसे लावा. हे केवळ सौंदर्य वाढवत नाहीत तर खोली मोठी आणि प्रकाशमान वाटते.
भारतीय राजेशाहीची झलक देणाऱ्या पेंटिंग्स, मूर्ती, हस्तकलाकृती किंवा कारपेट्स घरात लावल्यास ते एक भव्य आणि सांस्कृतिक लुक देतात.
मार्बल, टाईल्स वापरल्यास खोलीला राजेशाही लुक मिळतो. खासकरून पर्शियन किंवा ट्रेडिशनल डिझाईनचे कार्पेट यासाठी उत्तम.