Home Decoration Ideas: कमी खर्चात घराचा लुक बदलतील 'या' भन्नाट डेकोरेशन आयडिया!

गोमंतक ऑनलाईन टीम

फेरी लाइट्सने सजवा घर

घराच्या भिंतींवर, बाल्कनीत किंवा खिडक्यांजवळ फेरी लाइट्स लावा. कमी खर्चात घराला सुंदर आणि आकर्षक लुक मिळेल.

Home Decoration Ideas | Dainik Gomantak

रंगीबेरंगी कुशन कव्हर्स वापरा

जुन्या सोफा किंवा बेडचा लुक बदलण्यासाठी रंगीत कुशन कव्हर्स वापरा. सणानुसार वेगवेगळ्या डिझाइन्स निवडून घर सजवा.

Home Decoration Ideas | Dainik Gomantak

सुंदर रांगोळीने सजवा प्रवेशद्वार

प्रवेशद्वाराजवळ आकर्षक रांगोळी काढा. त्याभोवती पणत्या किंवा फुलांची सजावट केल्यास घराला पारंपरिक आणि प्रसन्न लुक मिळेल.

Home Decoration Ideas | Dainik Gomantak

जुन्या बाटल्यांचा करा क्रिएटिव्ह वापर

काचेच्या जुन्या बाटल्यांमध्ये फुले, फेरी लाइट्स किंवा सजावटीच्या वस्तू ठेवून आकर्षक शोपीस तयार करा.

Home Decoration Ideas | Dainik Gomantak

भिंतींना द्या नवा लुक

जुन्या फोटो फ्रेम्स, फॅमिली फोटोज किंवा स्वतः तयार केलेली वॉल आर्ट वापरून रिकाम्या भिंती सजवा.

Home Decoration Ideas | Dainik Gomantak

फुलांनी सजवा घराचे कोपरे

झेंडू, गुलाब किंवा मोगऱ्याच्या फुलांनी प्रवेशद्वार, देवघर आणि टेबल सजवा. घरात नैसर्गिक सुगंध आणि उत्सवी वातावरण निर्माण होईल.

Home Decoration Ideas | Dainik Gomantak

जुन्या वस्तूंचा करा पुनर्वापर

जुन्या ट्रे, टोपल्या, काचेच्या बरण्या किंवा लाकडी पेट्यांना रंग देऊन सजावटीच्या वस्तू तयार करा. यामुळे कमी खर्चात घराला हटके लुक मिळेल.

Home Decoration Ideas | Dainik Gomantak

दिवाळीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ट्राय करा 'हे' स्टायलिश लूक!

येथे क्लिक करा