Home Cleaning Hacks: घर दिसेल नेहमी चकाचक! सफाईसाठीच्या 'या' 7 सोप्या सवयी आजच लावा

गोमंतक ऑनलाईन टीम

दररोज १० मिनिटे आवराआवर करा

घरातील वस्तू जागच्या जागी ठेवा. दररोज थोडा वेळ आवराआवर केल्यास पसारा वाढत नाही आणि घर नीटनेटके दिसते.

Home Cleaning Hacks | Dainik Gomantak

स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा

स्वयंपाक झाल्यानंतर ओटा, गॅस आणि सिंक स्वच्छ पुसून घ्या. तेलाचे डाग आणि अन्नाचे कण लगेच काढल्यास चिकटपणा साचत नाही.

Home Cleaning Hacks | Dainik Gomantak

धूळ नियमित पुसून घ्या

फर्निचर, खिडक्यांच्या चौकटी, टीव्ही युनिट आणि टेबलवरील धूळ नियमित स्वच्छ करा. धूळ पुसताना ओलसर मायक्रोफायबर कापड वापरल्यास स्वच्छता सोपी होते.

Home Cleaning Hacks | Dainik Gomantak

बाथरूम रोज कोरडे ठेवा

आंघोळीनंतर शक्य असल्यास फरशीवरील पाणी काढा आणि हवा खेळती ठेवा. यामुळे ओलावा कमी होण्यास आणि बुरशीची वाढ रोखण्यास मदत होते.

Home Cleaning Hacks | Dainik Gomantak

बेडशीट आणि टॉवेल नियमित बदला

बेडशीट, उशांचे अभ्रे आणि टॉवेल नियमित धुवा. यामुळे घाम, धूळ आणि दुर्गंधी कमी ठेवण्यास मदत होते.

Home Cleaning Hacks | Dainik Gomantak

कचरा वेळेवर बाहेर टाका

ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवा. कचरापेटी नियमित रिकामी करून स्वच्छ केल्यास दुर्गंधी आणि कीटकांचा त्रास कमी होऊ शकतो.

Home Cleaning Hacks | Dainik Gomantak

साफसफाईचे साहित्य व्यवस्थित ठेवा

झाडू, फरशी पुसण्याचा मॉप, ब्रश आणि स्वच्छतेची उत्पादने एका ठरावीक जागी ठेवा. त्यामुळे गरजेच्या वेळी वस्तू सहज मिळतात आणि सफाई करणे सोपे होते.

Home Cleaning Hacks | Dainik Gomantak

त्वचा मऊ, हायड्रेटेड आणि ग्लोइंग हवी? 'या' टिप्स नक्की ट्राय करा

येथे क्लिक करा