Pramod Yadav
गोवा पर्यटकांसह फोटोग्राफर, सिनेकलाकार ते फिल्ममेकर्सना देखील नेहमीच आकर्षित करत राहिला आहे.
गोव्यात अनेक मराठी, हिंदीसह इतर भाषेतील देखील फिल्म चित्रित झाल्या आहेत. बॉलीवूडच्या तर अनेक फिल्मस् गोव्यात शूट झाल्यात.
पण, हॉलीवूडच्या देखील अनेक फिल्म गोव्यात चित्रित झाल्या आहेत. राज्यातील काही खास लोकेशन्सवर हे चित्रीकरण झाले आहे.Fontainhas
पणजीतील फोन्तेन्हास नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असते. हॉलीवूडची 'सी व्होल्वज' नावाची फिल्ममधील काही भाग फोन्तेन्हास येथे चित्रित करण्यात आला आहे.
स्वच्छ, शांत आणि सुंदर अशी ओळख असणाऱ्या पाळोळे समुद्रकिनारा परिसरात 'बोर्ने सुप्रम्सी' या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.
पणजीपासून जवळ असणारा प्रसिद्ध दोना पाऊल जेट्टी येथे बॉलीवूड चित्रपटाचे चित्रीकरण झालंय, शिवाय येथे 'बँकॉक हिल्टन' सारख्या हॉलीवूड चित्रपटाचे देखील चित्रीकरण झाले आहे.
याच दोना पाऊल जेट्टीवर बॉलीवूड सुपरहिट सिंघम चित्रपटाचे देखील चित्रीकरण झाले आहे. तेव्हापासून या जे्ट्टीला सिंघम स्पॉट म्हणून देखील ओळखले जाते.