पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केले होते 'हे' मध्ययुगीन प्रमुख बंदर! आजही आहे मुंबईपासून इतक्या अंतरावर...

गोमन्तक डिजिटल टीम

मध्ययुगीन प्रमुख बंदर

कोकण किनारपट्टीवरील मुंबईच्या आग्नेय दिशेस सुमारे ८५ मैलावर दाभोळ हे एक मध्ययुगीन कालखंडात प्रमुख बंदर असल्याचे बरेच उल्लेख आढळतात.

Medieval Port | Dabhol Port

घोड्यांची आयात

दाभोळ बंदरात अरबस्थानातून घोड्यांची आयात होत असे. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला घोड्यांचा व्यापार अरबांच्या हातात होता

Dabhol Port | Ancient Port

पोर्तुगिज आरमार

१५०७ मध्ये पोर्तुगिजांनी गव्हर्नर फ्रान्सिस्को आल्मेडाचा मुलगा लोरेंझो याच्या आधिपत्याखाली केरळनंतर पश्चिम किनारपट्टी व्यापारासाठी खुली करण्यास आरमार पाठवले.

Medieval Port | Old Port

दुहेरी उद्देश

दाभोळ आक्रमणात त्याचा दुहेरी उद्देश होता. एक तर भारतीय सत्तांना धडा शिकवणे आणि बिजापूरच्या आर्थिक समृद्धीचा कणा मोडणे.

Indian Old Port

दाभोळची राखरांगोळी

आदिलशाहीत वैभवशाली शहर असलेल्या दाभोळची राखरांगोळी करून टाकली. सोबत गोवा काबीज करून आदिलशाहीला दुसरा धक्का दिला.

Medieval Port

करार

आदिलशहा व पोर्तुगीज यांच्यात करार झाला. १५०८ साली केलेल्या आल्मेडाच्या विध्वंसासातून दाभोळ शहर हळूहळू सावरले.

Dabhol Port

मोठी नगरी

पोर्तुगिजांनी १५२२ दाभोळ पुन्हा एकदा लुटले. परंतु या लुटीनंतरही दाभोळ १५४०मध्ये जगातील एक मोठी नगरी म्हणून उदयास आले.

Dabhol

पुन्हा उद्ध्वस्त

पुढे सातच वर्षात या नगरीचे वैभव ओसरले. १५४७च्या सुमारास पोर्तुगिजांनी दाभोळ पुन्हा उद्ध्वस्त केले.

Dabhol Harbor
Wadi Al Jarf|Egypt Read Sea
आणखी पाहा