गोमन्तक डिजिटल टीम
जगातील सर्वात जुने बंदर पुरातत्वशास्त्रज्ञांनी इजिप्तच्या लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वाडी अल जार्फ येथे शोधून काढले आहे.
वाडी अल जार्फ येथे लाटांच्या खाली सापडलेले स्मारकीय बंदर ४६00 वर्षांपूर्वीचे आहे.
चेप्स ज्याला खुफू नावाने देखील ओळखले जाते त्याने सुएझच्या दक्षिणेस हे बंदर उभारले.
प्रामुख्याने इथून तांबे आणि खनिजे आयात होत होती जे पिरॅमिडसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांच्या निर्मितीसाठी वापरायचे.
कैरोमधील फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी आणि सॉर्बोन विद्यापीठातील सागरी पुरातत्वशास्त्रज्ञांनी चेप्सने बांधलेले स्मारकीय जलमग्न बंदर संकुल शोधले आहे
पुरातत्वशास्त्रज्ञांना मुरिंग एरियामध्ये जहाजांचे नांगर सापडले होते.
बंदराच्या कामकाजासाठी इथे प्रशासकीय केंद्रे होती आणि काम करणाऱ्या खाण कामगारांसाठी साहित्य आणि खाद्यपदार्थ साठवले जात असे.