Historical Places At North Goa: नॉर्थ गोव्यातील ही ऐतिहासिक ठिकाणे आपण पाहिली आहेत का?

गोमन्तक डिजिटल टीम

रेस मॅगोस किल्ला

रेस मॅगोस किल्ला हा गोव्यातील जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे. मांडवी नदीच्या काठावरती पणजीकडे तोंड करून हा किल्ला वसवलेला आहे. आधी या जागी आदिलशाहीचे ठाणे होते. हा किल्ला नंतर पोर्तुगीजांनी जिंकला होता.

Reis Magos Fort | Dainik Gomantak

व्हाईसरॉयची कमान

व्हाइसरॉय फ्रान्सिस्को दा गामा यांनी १६व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधलेली कमान ही एक ऐतिहासिक वास्तू आहे जे एकेकाळी जुन्या गोव्याचे प्रवेशद्वार होते. वास्को द गामा यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधले गेले.

Viceroy's Arch | Dainik Gomantak

से कॅथेड्रल चर्च

आशियातील सर्वात मोठ्या चर्चपैकी आणि गोव्यातील ही एक महत्त्वाची चर्च आहे. जुन्या गोव्यातील हे ठिकाण सेंट कॅथरीनला समर्पित आहे. से कॅथेड्रल हे पोर्तुगीज-मॅन्युलिन वास्तुशैलीचे प्रदर्शन करणारी वास्तू आहे.

Se Cathedral | Dainik Gomantak

सेंट ऑगस्टीन टॉवर

ही एक उध्वस्त वास्तू आहे जे एकेकाळी गोव्यातील सर्वात मोठे चर्च होते. चर्चमध्ये चार बुरुज होते त्यापैकी फक्त एकच शिल्लक आहे. 1602 मध्ये बांधकाम पूर्ण झालेले हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ यादीत आहे.

St. Augustine Tower | Dainik Gomantak

आग्वाद किल्ला

१७ व्या शतकातील हा पोर्तुगीज किल्ला आहे. मांडवी नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर याची स्थापना केलेली आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथले चार मजली दीपगृह जे आशियात एकाच ठिकाणी आढळून येते.

Fort Aguada | Dainik Gomantak

बॅसिलिका ऑफ बॉम जिझस

बारोक वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असे हे चर्च 1594 मध्ये बांधले गेले. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष इथे आहेत आणि 400 वर्षांनंतरही ते चांगल्या स्थितीत आहेत. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून या ठिकाणाला मान्यता दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Basilica of Bom Jesus | Dainik Gomantak