Akshata Chhatre
गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने सध्या बरीच लगबग सुरू झाली आहे. साधारण दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या या महोत्सवाची आकर्षणे जाणून घेऊया.
यावर्षीच्या IFFI मध्ये अनेक नवीन निर्मात्यांना तसेच दिग्दर्शकांना संधी दिली जाईल. यामध्ये लक्ष्मीप्रिया देवी, राजेश नारायणन, मनोहर के आणि इतरांच्या चित्रपटांचा सन्मान केला जाईल.
यंदाच्यावर्षी रणदीप हुड्डा यांच्याद्वारे दिगदर्शित केलेल्या स्वातंत्र्यवीर सावकर या चित्रपटाने IFFIची सुरुवात होईल.
इंडियन पॅनोरमा सेक्टरच्या अंतर्गत 25 फिचर फिल्म्स आणि 20 नॉन फिचर फिल्म्स दाखवले जातील.
आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा राज कपूर, महंमद रफी, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव इत्यादी दिग्गज्यांच्या योगदानाचा सन्मान केला जाईल.
यावर्षी IFFIमध्ये ऑस्ट्रेलिया प्रमुख आकर्षण असेल. ऑस्ट्रेलियामधल्या विविध चित्रपटांना यावेळी प्रदर्शनाची संधी दिली जाईल.
IFFI म्हणजे चित्रपट प्रेमींसाठी पर्वणी असते आणि म्हणून यंदा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात लोकं गोव्यात येण्याची अपेक्षा आहे.