Sameer Amunekar
क्रिकेटच्या टी-२० फॉरमॅटमध्ये दररोज काही ना काही विक्रम मोडले जातात.
या वेबस्टोरीमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्या करणाऱ्या टॉप-५ संघांबद्दल जाणून घेऊया.
टी-२० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झिम्बाब्वे क्रिकेट संघाच्या नावावर आहे. २०२४ मध्ये गांबियाविरुद्ध झिम्बाब्वेने ४/३४४ धावांचा डोंगर उभा केला होता.
या यादीत नेपाळ क्रिकेट संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०२३ मध्ये मंगोलियाविरुद्ध खेळताना नेपाळने बोर्डवर ३१४/३ धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडच्या ३०४/२ धावांच्या खेळीमुळे हा संघ या यादित तिसऱ्या स्थानावर आहे.
या यादीत भारतीय क्रिकेट संघाचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ६ विकेट गमावून २९७ धावा केल्या होत्या.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या झिम्बाब्वे संघाचे नाव या यादीत दुसऱ्यांदा आले आहे. सेशेल्सविरुद्ध झिम्बाब्वेने ५ विकेट गमावून २८६ धावा केल्या.
मराठा साम्राज्यानं बांधलेला शेवटचा किल्ला 'किल्ले मल्हारगड'