Pranali Kodre
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेचा तिसरा सामना गुवाहाटीला 28 नोव्हेंबर रोजी पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर 5 विकेट्सने विजय मिळवला.
मात्र, याच सामन्यात भारताकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शानदार शतकी खेळी केली होती.
ऋतुराजने 57 चेंडूत 123 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 7 षटकार मारले.
त्यामुळे ऋतुराज आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला.
या यादीत अव्वल क्रमांकावर शुभमन गिल असून त्याने अहमदाबादला न्यूझीलंडविरुद्ध 2023 सालीच झालेल्या टी20 सामन्यांत नाबाद 126 धावांची खेळी केली होती.
तसेच तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने अफगाणिस्तानविरुद्ध दुबईमध्ये 2021 साली 122 धावांची नाबाद खेळी केली होती.
चौथ्या क्रमांकावर रोहित शर्माने इंदोरला 2017 साली श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात केलेली 118 धावांची खेळी आहे.
तसेच पाचव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव असून त्याने इंग्लंडविरुद्ध नॉटिंगघमला 2022 साली झालेल्या टी20 सामन्यात 117 धावांची खेळी केली होती.