हार्दिक IPL मध्ये ट्रेड झालेला तिसराच कर्णधार

Pranali Kodre

हार्दिकची घरवापसी

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी होणार असून त्याआधीच मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.

Hardik Pandya | X

ट्रेड

आयपीएल 2024 स्पर्धेच्या लिलावाआधी गुजरात टायटन्सने कर्णधार हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सबरोबर ट्रेड केले आहे.

Hardik Pandya | X

कर्णधारपद

आयपीएल 2021 नंतर मुंबईने हार्दिकला करारमुक्त केल्यानंतर गुजरातने त्याला 15 कोटीच्या किंमतीत संघात घेत कर्णधारपद सोपवलं होतं.

Hardik Pandya | X

नेतृत्व

हार्दिकनेही गुजरातचे शानदार नेतृत्व करत 2022 साली आयपीएलचे विजेतेपही मिळवले, मात्र 2023 साली गुजरातला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यानंतर आता गुजरातने त्याला मुंबईबरोबर ट्रेड केले आहे.

तिसराच कर्णधार

त्यामुळे हार्दिक आयपीएलमध्ये ट्रेड होणारा तिसराच कर्णधार ठरला आहे.

Hardik Pandya | X

आर अश्विन

यापूर्वी पंजाब किंग्सने त्यांचा कर्णधार आर अश्विनला आयपीएल 2020 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सबरोबर ट्रेड केले होते.

R Ashwin | X/DelhiCapitals

अजिंक्य रहाणे

तसेच आयपीएल 2020 पूर्वीच राजस्थान रॉयल्सनेही कर्णधार अजिंक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्सबरोबरच ट्रेड केले होते.

Ajinkya Rahane | X/DelhiCapitals

विराट कोहलीला मारहाण? जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य

Virat Kohli