Manish Jadhav
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेल्याला दुसऱ्या टी-20 सामन्यात डेवाल्ड ब्रेव्हिसने अफलातून फलंदाजी केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात डेवाल्ड ब्रेव्हिस चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने तूफानी फटकेबाजी करत 41 चेंडूत शतक झळकावले. यात त्याने चौकार आणि षटकारांची बरसात केली.
अवघ्या 22 वर्षे आणि 105 दिवसांचा असलेला ब्रेव्हिस आता दक्षिण आफ्रिकेसाठी टी-20 मध्ये शतक करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनला.
ब्रेव्हिसने 125 धावांची तूफानी खेळी खेळली. टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे.
या दमदार खेळीने ब्रेव्हिसने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ डू प्लेसिसचा सुमारे 10 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. डू प्लेसिसने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 119 धावा केल्या होत्या.
41 चेंडूत शतक ठोकणारा ब्रेव्हिस दक्षिण आफ्रिकेसाठी टी-20 मध्ये दुसरे सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला. डेविड मिलरने 35 चेंडूत शतक केले होते.
125 धावांची तूफानी खेळी खेळून ब्रेव्हिसने हाशिम आमलाचाही विक्रम मोडला. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध हाशिम आमलाने 97 धावा केल्या होत्या, जो दोन्ही संघांमधील सर्वोच्च वैयक्तिक स्कोर होता.
आपल्या 56 चेंडूंच्या खेळीत ब्रेव्हिसने 12 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकार लगावले. त्याने कोणत्याही गोलंदाजाला सोडले नाही. त्याने प्रत्येक ऑस्ट्रेलियन गोलंदाजीची धुलाई केली.