Sameer Amunekar
कोमट पाणी प्या, यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. नारळपाणी आणि लिंबूपाणी फायदेशीर ठरते.
दीर्घ श्वसन (Deep Breathing) आणि ध्यान करा. तणावामुळे रक्तदाब वाढतो, त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा.
लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या खा, हे रक्तदाब नियंत्रित ठेवते. बीटचा रस प्यायल्यानेही रक्तदाब कमी होतो.
मीठाचे प्रमाण कमी करा, कारण जास्त मीठ रक्तदाब वाढवू शकते. केळी, संत्री, पालक आणि टोमॅटो यांसारख्या पोटॅशियमयुक्त पदार्थांचे सेवन करा.
दररोज ३० मिनिटे चालण्याचा किंवा हलका व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. योगासने (विशेषतः प्राणायाम आणि शवासन) फायदेशीर असतात.
जास्त चहा-कॉफी टाळा, यामुळे रक्तदाब वाढू शकतो. साखर आणि तेलकट पदार्थांचे सेवन मर्यादित करा.