Hidden Konkan: निळाशार समुद्र अन् प्राचीन मंदिरे! कोकणातील 7 'हिडन जेम्स' जे तुमची ट्रिप अविस्मरणीय करतील

Sameer Amunekar

वेळणेश्वर (रत्नागिरी)

गुहागर जवळ असलेले हे ठिकाण अध्यात्म आणि निसर्गाचा सुंदर संगम आहे. येथील समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ असून किनाऱ्यालगतच जुने महादेवाचे मंदिर आहे. इथली शांतता तुम्हाला मंत्रमुग्ध करेल.

Hidden Konkan | Dainik Gomantak

कोर्लई किल्ला आणि दीपगृह

रेवदंडा ओलांडल्यानंतर कोर्लईचा हा पोर्तुगीजकालीन किल्ला लागतो. किल्ल्यावरून दिसणारा समुद्राचा 'पॅनोरॅमिक व्ह्यू' अफलातून आहे. येथील पांढऱ्या रंगाचे दीपगृह आणि शेजारील निळाशार समुद्र फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम आहे

Hidden Konkan | Dainik Gomantak

भोगवे बीच (सिंधुदुर्ग)

तारकर्लीच्या गर्दीपासून दूर जायचे असेल, तर भोगवेला पर्याय नाही. इथे कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम होतो. हा किनारा इतका स्वच्छ आहे की याला 'ब्लू फ्लॅग' मानांकन मिळालेले आहे. नशिबात असेल तर इथे तुम्हाला डॉल्फिनही दिसू शकतात.

Hidden Konkan | Dainik Gomantak

आडीवरे - महाकाली मंदिर (रत्नागिरी)

रत्नागिरीपासून साधारण ३० किमी अंतरावर असलेले आडीवरे गाव अत्यंत शांत आहे. येथील श्री महाकाली मंदिर प्राचीन असून परिसरातील वातावरण खूप प्रसन्न आहे. मंदिराच्या जवळच असलेला कशेळीचा 'कनकादित्य' सूर्यमंदिर देखील पाहण्यासारखे आहे.

Hidden Konkan | Dainik Gomantak

कोंडुरा बीच (सिंधुदुर्ग)

वेंगुर्ल्यातील हा एक छोटासा पण अतिशय सुंदर असा 'प्रायव्हेट' वाटावा असा समुद्रकिनारा आहे. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र अशा कुशीत हे ठिकाण वसले आहे. ज्यांना गर्दी अजिबात आवडत नाही, त्यांच्यासाठी हे नंदनवन आहे.

Hidden Konkan | Dainik Gomantak

हेदवी - दशभुजा गणपती (रत्नागिरी)

वेळणेश्वर जवळच असलेले हेदवी गाव त्याच्या दशभुजा गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर पेशवेकालीन असून मूर्ती संगमरवरी आहे. जवळच 'बा्मणघळ' नावाचे निसर्गाचे एक नवल पाहायला मिळते, जिथे समुद्राचे पाणी खडकातून कारंज्यासारखे वर उडते.

Hidden Konkan | Dainik Gomantak

कुणकेश्वर (सिंधुदुर्ग)

देवगड जवळ असलेले हे मंदिर 'कोकणची काशी' म्हणून ओळखले जाते. समुद्राच्या अगदी काठावर असलेले हे भव्य शिवमंदिर पाहायला दुरून लोक येतात. मंदिराच्या पायऱ्या उतरल्या की थेट समुद्र लागतो, हे दृश्य अतिशय विलोभनीय असते.

Hidden Konkan | Dainik Gomantak

सुरकुत्यांना म्हणा 'बाय-बाय'; फॉलो करा हे '6-स्टेप्स'

Skin Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा