Konkan Tourism: चिपळूणपासून हाकेच्या अंतरावरील कोकणातील 'हा' स्वर्ग तुम्ही पाहिलाय का? फोटोग्राफी प्रेमींसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

Manish Jadhav

हेदवी समुद्रकिनारा

कोकणातील गुहागर तालुक्यातील हेदवी समुद्रकिनारा हा पर्यटकांसाठी एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. इथली पांढरी वाळू आणि नारळ-पोफळीच्या बागा पर्यटकांचे मन मोहून टाकतात.

Hedvi Beach | Dainik Gomantak

दशाभुज गणेश मंदिर

हेदवीची खरी ओळख म्हणजे येथील प्राचीन दशाभुज गणेश मंदिर. पेशवेकालीन असलेल्या या मंदिरात श्री गणेशाची 10 हातांची भव्य मूर्ती आहे, जी पाहण्यासाठी भाविक दुरुन येतात.

Hedvi Beach | Dainik Gomantak

नैसर्गिक 'बामणघळ'

हेदवी किनाऱ्याजवळील मुख्य आकर्षण म्हणजे 'बामणघळ'. समुद्राच्या लाटा काळ्या पाषाणातील एका मोठ्या भेगेतून (घळ) आदळतात तेव्हा पाण्याचे तुषार 60-70 फूट उंच उडतात, हे दृश्य पाहण्यासारखे असते.

Hedvi Beach | Dainik Gomantak

काळ्या पाषाणयुक्त खडक

या किनाऱ्यावर कोकणातील इतर किनाऱ्यांप्रमाणे केवळ वाळू नसून, सुंदर काळे पाषाणही पाहायला मिळतात. समुद्राचे पाणी या दगडांवरुन वाहताना खूप आकर्षक दिसते.

Hedvi Beach | Dainik Gomantak

विश्रांतीसाठी उत्तम ठिकाण

जर तुम्हाला शहराच्या गजबजाटापासून दूर एकांत हवा असेल, तर हेदवी हा सर्वोत्तम पर्याय आहे. येथे पर्यटकांची फार गर्दी नसते, त्यामुळे शांतता अनुभवता येते.

Hedvi Beach | Dainik Gomantak

कोकणी पाहुणचार आणि सीफूड

हेदवीमध्ये राहण्यासाठी अनेक घरगुती 'होमस्टे' उपलब्ध आहेत. येथे अस्सल कोकणी जेवण, विशेषतः उकडीचे मोदक आणि ताज्या मासळीचा आस्वाद घेता येतो.

Hedvi Beach | Dainik Gomantak

जवळील पर्यटन स्थळे

हेदवीच्या जवळच वेलणेश्वर हा आणखी एक सुंदर समुद्रकिनारा आणि शिवमंदिर आहे. तसेच गुहागरचा समुद्रकिनारा देखील इथून जवळच आहे.

Hedvi Beach | Dainik Gomantak

कसे पोहोचायचे?

हेदवीला जाण्यासाठी चिपळूण हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. चिपळूण किंवा रत्नागिरीहून एसटी बस किंवा खाजगी वाहनाने सहजरित्या पोहोचता येते.

Hedvi Beach | Dainik Gomantak

Pandavgad Fort: शिलाहार राजांचा वारसा आणि शिवरायांचा पराक्रम! 4177 फूट उंचीवरील वाईच्या सौंदर्याचा मुकुटमणी 'पांडवगड'

आणखी बघा