गोमन्तक डिजिटल टीम
राज्यासहित देशातून नैऋत्य मॉन्सूनने माघार घेतली आहे.
उत्तर पूर्व मॉन्सूनचा परिणाम यंदा राज्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात जोरदार पावसाची बरसात सुरू असून
आकस्मिक पडत असलेल्या या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे भरतीच्यावेळी समुद्राच्या पातळीत वाढ झाली आहे.
किनाऱ्यालगत उभारण्यात आलेल्या शॅक्सना त्याचा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात शॅक्सचे नुकसान झाले आहे
राज्यातील नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांवर फिरू नये अशी सूचना करण्यात आली आहे.