Sameer Amunekar
उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान खूप जास्त वाढणे, ज्यामुळे जीवघेणा परिणाम होऊ शकतो. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित खालील उपाय करावेत.
उष्माघात झाल्यास व्यक्तीला सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवणे हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय आहे. थंड वातावरण शरीराचे तापमान कमी करण्यात मदत करते आणि पुढील गंभीर परिणाम टाळता येतात.
उष्माघात झाल्यास व्यक्तीचे कपडे सैल करणे आणि शरीरावर थंड पाणी शिंपडणे हे अत्यंत महत्त्वाचे उपाय आहेत.
बर्फाच्या पिशव्यांचा उपयोग करून मान, बगल आणि मांड्यांवर शेक देणे हा उष्माघात कमी करण्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे.
उष्माघात झालेल्या व्यक्तीला थंड पाणी पाजण्याचा प्रयत्न करावा, पण जर व्यक्ती बेशुद्ध असेल तर पाणी पाजू नये. अशावेळी वेळ न दवडता योग्य वैद्यकीय मदत घ्यावी.
उष्माघात टाळण्यासाठी योग्य आहार घ्या. फळांचे रस, नारळ पाणी, ताक यांचा समावेश आहारात करा.