Manish Jadhav
हृदय हा आयुष्यभर सतत काम करत असलेला हा एक शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे.
सतत कष्ट करण्याची सवय असलेले हृदय अनेकदा आजारांनी ग्रासले जाते. वेगवेगळे आजार या हृदयाच्या ठिकाणी होण्याची शक्यता असते.
हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यावर संपूर्ण शरीराला होणारा रक्तपुरवठासुद्धा कमी होतो. परिणामतः या कमी झालेल्या रक्तपुरवठ्यामुळे संपूर्ण शरीराला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी झाल्यास त्याचे कार्य कमी होते. याला "करोनरी आर्टरी डिसिज' असे म्हटले जाते.
वयाच्या चाळिशीनंतर सर्वसाधारणपणे हा आजार होण्याची शक्यता वाढते.
अतिशय चरबीयुक्त पदार्थांचे सेवन, सिगारेट किंवा बिडी, दारुचे सेवन, मानसिक ताण सतत असणे, घराण्यामध्ये या आजाराचा इतिहास असणे, मधुमेह, लठ्ठपणा, उच्चरक्तदाब अशा अनेक कारणांमुळे हा विकार होण्याची शक्यता जास्त असते.
हृदयरोगी व्यक्तीने व्यसनांपासून दूर रहावे. वजन नियंत्रणात ठेवल्यास आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. यामध्ये हृदयरोगाचाही समावेश होतो. शारीरिक व्यायाम आणि मानसिक संतुलन यामुळे हृदयरोग टाळणे सहज शक्य आहे.