Manish Jadhav
सध्याच्या धावपळीच्या जीवनात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी चांगल्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे.
आज (8 डिसेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून हृदयाच्या आरोग्यासाठी काय फायदेशीर आहे याबद्दल जाणून घेणार आहोत..
बदाम, अक्रोड, चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, फायबर, हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात असतात; जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, बेरी ही फळे अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, फायबर कन्टेंटचा आहार स्रोत आहेत; ज्यामुळे जळजळ कमी होते, हृदयरोगापासून तुमचे संरक्षण होते.
ओट्स शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतात. हा एक बेस्ट नाश्तादेखील आहे.
गाजर, काकडी, भोपळी मिरचीचे तुकडे हम्मसमध्ये बुडवून खाल्ल्याने तुम्हाला हेल्दी फॅट्स व्यतिरिक्त फायबरदेखील मिळतात.
डार्क चॉकलेटमध्ये फ्लॅवोनॉइड असतात; जे रक्ताभिसरण सुधारुन रक्तदाब कमी करण्यात मदत करतात.