Sameer Panditrao
आदल्या रात्री वेळेत झोपणे व व्यवस्थित जेवावे.
उपवासाच्या दिवशी सकाळी वेळेत उठून स्नान, योगासने, प्राणायाम ही नित्यकर्मे करावीत.
उपवासाच्या दिवशी आवडीची कामे करावीत.
उपवासाच्या दिवशी स्वास्थ्यसंगीत ऐकणे, एखादे चांगले पुस्तक वाचणे, मित्रपरिवाराशी गप्पा मारणे हे अधिक उचित ठरेल.
उपवासाच्या दिवशी थोडा आराम करणे, फार प्रमाणात बाहेर फिरायला न जाणे, उन्हात न बसणे, फार वेळ वाहनात न बसणे या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या.
अधिक प्रमाणात व्यायाम करणाऱ्यांनी, जिमला जाणाऱ्यांनी उपवासाच्या दिवशी या दोन्ही गोष्टी टाळलेल्याच बऱ्या.
कुठलाही वाद-विवाद, चिडचिड, अप्रिय प्रसंगाबद्दल बोलणे वा त्याचा प्रत्यक्ष भाग होणे उपवासाच्या दिवशी टाळणेच श्रेयस्कर ठरते.