कॅन्सरपासून सुरक्षित राहायचं? मग 'या' 6 सवयी अंगीकारा

Sameer Amunekar

तंबाखू आणि धूम्रपान

तंबाखू सेवन हे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण आहे. विशेषतः फुफ्फुस, तोंड, गळा आणि अन्ननलिकेचा कॅन्सर. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींचा कॅन्सरचा धोका नॉन-स्मोकरपेक्षा 15 ते 30 पट अधिक असतो. तंबाखूचे कोणतेही रूप असो – ते टाळणेच हिताचे!

Cancer prevention lifestyle tips | Dainik Gomantak

आहार

आहारात भरपूर प्रमाणात फळं, भाज्या, संपूर्ण धान्ये आणि फायबर असलेले पदार्थ घ्या. जास्त प्रमाणातील साखर, चरबी आणि प्रोसेस्ड फूड टाळा.

Cancer prevention lifestyle tips | Dainik Gomantak

नियमित व्यायाम

दररोज किमान 30 मिनिटांचा व्यायाम जसे की चालणे, धावणे, योग किंवा सायकल चालवणे-कॅन्सर, विशेषतः स्तन व आतड्यांच्या कॅन्सरचा धोका कमी करतो.

Cancer prevention lifestyle tips | Dainik Gomantak

वजन नियंत्रणात ठेवा

अतिरिक्त वजनामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण होते, जे स्तन, गर्भाशय, अन्ननलिका, यकृत इत्यादी कॅन्सरचा धोका वाढवू शकते. त्यामुळे बीएमआय नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

Cancer prevention lifestyle tips | Dainik Gomantak

अल्कोहोलचं प्रमाण

अल्कोहोलचे जास्त सेवन हे तोंड, गळा, यकृत, स्तन इत्यादी कॅन्सरशी संबंधित आहे. शक्य असल्यास अल्कोहोल टाळा किंवा खूपच कमी प्रमाणात घ्या.

Cancer prevention lifestyle tips | Dainik Gomantak

सूर्यप्रकाशापासून संरक्षण

सूर्यकिरणांपासून होणारा यूव्ही रेडिएशन त्वचेला हानी पोहोचवतो. त्यामुळे सकाळी 10 नंतर व संध्याकाळी 4 वाजेपर्यंत थेट सूर्यप्रकाश टाळा.

Cancer prevention lifestyle tips | Dainik Gomantak
Famous Waterfall In Konkan | Dainik Gomantak
येथे क्लिक करा