Manish Jadhav
राज्यात (Goa) पुन्हा डेंग्यूचे रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. एकट्या फोंड्यात जून ते 15 ऑगस्टपर्यंत डेंग्यूचे 26 संशयास्पद रुग्ण आढळून आले. डेंग्यूची लागण झाल्याने गोव्यात एकाचा मृत्यूही झाला आहे.
डेंग्यूची लागण झाल्यास रुग्णाने काय खावे आणि काय खावू नये असा प्रश्न पडतो. पण आज या वेबस्टोरीच्या माध्यमातून आपण तज्ञ डॉक्टर कोमल बोरसे यांनी सांगितलेल्या आहाराबाबत जाणून घेणार आहोत...
डॉ. कोमल बोरसे यांनी सकाळ वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार, डेंग्यूची लागण झाल्यास कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे याविषयी सविस्तर सांगितले आहे.
डेंग्यूच्या आजरणात कच्चे किंवा कमी शिजवलेल्या पदार्थांचे सेवन करु नका. कारण संसर्गाचा धोका वाढू शकतो.
एकाचवेळी जास्त खाल्याने तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे घरगुती उपाय करु नका.
सकाळी उठल्यानंतर तुम्ही जिरे पावडर टाकून गरम पाणी प्या. तर नाश्त्यामध्ये घरीच बनवलेले इडली डोसा, उपमा घ्या.
संत्रे, ड्रॅगन फ्रूट, पपई, अंजीर डाळिंब किंवा नारळ पाणी तुम्ही घेऊ शकता.
दुपारच्या जेवणात तुम्ही वरण-भात, कमी तेलाच्या भाज्या, दही किंवा ताक घेऊ शकता.
सध्यांकाळी आहार एकदम हलका घेतला पाहिजे. ज्यामध्ये तुम्ही मग मुगाचे किंवा कुळथाचे कढण, चिकन सूप प्यावे.
झोपताना तुम्ही हळद मिश्रित दूध घेतले पाहिजे. मात्र दूध उकळत असताना वरुन हळद टाकू नये. कारण हळदीची पोषण तत्वे कमी होतात.