Manish Jadhav
उन्हाळ्यात लोक अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड्रिंक्स पितात, परंतु त्यातील रसायने आणि प्रिझर्वेटिव्ह्ज शरीराला हानी पोहोचवू शकतात.
तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
उन्हाळ्यात थंड तुळशीचा सरबत किंवा कोल्ड्रिंक शरीराला डिटॉक्स करते आणि ऊर्जा प्रदान करते.
तुळशीचा सरबत पिल्याने चीडचीड, थकवा आणि उष्माघातापासून संरक्षण मिळते.
तुळशीचा सरबत पिल्यास पचनक्रिया सुधारते. तसेच, गॅस, अपचन यासारख्या पोटाच्या समस्यांपासून सरबत आराम देतो. तुळस शरीराला डिटॉक्स करते आणि त्वचा देखील सुधारते.
उन्हाळ्यात घाम आणि गरम हवेमुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी हे पेय खूप प्रभावी ठरते.
तुळशीचे शीतपेय उन्हाळ्यात नैसर्गिक ऊर्जा पेयासारखे काम करते, जे शरीराला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय थंडावा आणि ताजेपणा देते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचा सरबत पिणे फायदेशीर असते. तुळशीचा सरबत पिल्याने शरीरातील इन्सुलिनची मात्रा नियंत्रित राहाते.