Sameer Amunekar
संध्याकाळी शरीराचे तापमान दिवसाच्या तुलनेत थोडं जास्त असते, त्यामुळे स्नायू अधिक लवचिक राहतात आणि दुखापतीचा धोका कमी होतो.
दिवसभराच्या अन्नाच्या सेवनामुळे शरीरात ऊर्जा असते, त्यामुळे व्यायाम करताना दम लागत नाही.
दिवसभराच्या कामाच्या तणावानंतर व्यायाम केल्याने मानसिक शांतता मिळते आणि तणाव दूर होतो.
संध्याकाळचा व्यायाम केला तर रात्री झोप लवकर लागते आणि गाढ झोप येते (फक्त झोपण्याच्या अगदी आधी व्यायाम नको).
सकाळी वेळ न मिळणाऱ्यांसाठी संध्याकाळी व्यायाम करणं हा एक चांगला पर्याय असतो, त्यामुळे सातत्य राखता येतं.
संध्याकाळी लोक सहसा मोकळे असतात, त्यामुळे मित्र-मैत्रिणींसोबत वर्कआउट करणं शक्य होतं – हे अधिक प्रेरणादायक असते.