Health Tips: बॉडी बनवण्याची घाई पडेल महागात? वाढत्या फिटनेस ट्रेंडमध्ये प्रोटीन पावडर शरीरासाठी अमृत की विष?

Sameer Amunekar

झटपट बॉडी बनवण्याची 'घाई'

नॅचरल डाएटऐवजी केवळ प्रोटीन पावडरवर अवलंबून राहून एका रात्रीत किंवा काही महिन्यांत पीळदार शरीर बनवण्याचा अट्टाहास आरोग्याला मोठ्या संकटात टाकू शकतो.

Health Tips | Dainik Gomantak

प्रोटीन पावडर: अमृत की विष?

मर्यादित आणि योग्य प्रमाणात घेतल्यास प्रोटीन पावडर स्नायूंच्या वाढीसाठी अमृत ठरते. मात्र, ट्रेनरच्या चुकीच्या सल्ल्याने किंवा अतिवापराने त्याचे रूपांतर विषात होऊ शकते.

Health Tips | Dainik Gomantak

किडनी आणि लिव्हरवर अतिरिक्त ताण

शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त प्रोटीन मिळाल्यास, ते पचवण्यासाठी किडनी आणि लिव्हरला (यकृत) दुप्पट काम करावे लागते. यामुळे भविष्यात किडनी स्टोन किंवा लिव्हर निकामी होण्याचा धोका वाढतो.

Health Tips | Dainik Gomantak

पचनाच्या गंभीर समस्या

अनेक प्रोटीन पावडर्समध्ये कृत्रिम गोडवा (Artificial Sweeteners) आणि प्रिजर्व्हेटिव्ह्ज असतात. यामुळे गॅस, बद्धकोष्ठता (Constipation), पोट फुगणे आणि अपचनाचा त्रास सुरू होतो.

Health Tips | Dainik Gomantak

भेसळयुक्त प्रॉडक्ट्सचा मोठा धोका

मार्केटमध्ये मिळणाऱ्या अनेक स्वस्त किंवा अनधिकृत प्रोटीन पावडर्समध्ये स्टेरॉईड्स आणि जड धातूंची (Heavy Metals) भेसळ असण्याची शक्यता असते, जी थेट हृदयावर परिणाम करते.

Health Tips | Dainik Gomantak

नॅचरल प्रोटीनची जागा पावडर घेऊ शकत नाही

अंडी, चिकन, पनीर, डाळी आणि मोड आलेली कडधान्ये यांमधून मिळणारे नॅचरल प्रोटीन शरीरासाठी नेहमीच सर्वोत्तम आणि सुरक्षित असते. सप्लिमेंट्स हा फक्त एक पर्याय आहे, मूळ अन्न नाही.

Health Tips | Dainik Gomantak

डॉक्टरांचा सल्ला आहे अनिवार्य!

कोणतीही प्रोटीन पावडर सुरू करण्यापूर्वी स्वतःच्या शरीराची गरज ओळखा. स्वतःच्या मनाने निर्णय न घेता तज्ज्ञ डॉक्टर किंवा सर्टिफाइड न्यूट्रिशनिस्टचा सल्ला नक्की घ्या.

Health Tips | Dainik Gomantak

व्यायाम करताना 'या' चुका करताय? वाढू शकतो गुडघेदुखीचा त्रास

Workout Mistakes | Dainik Gomantak
येथे क्लिक करा