Sameer Amunekar
रिकाम्या पोटी जास्त तुळस खाल्ल्यास काही लोकांना अॅसिडिटी किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो.
तुळस ब्लड शुगर कमी करते; मधुमेहाची औषधे घेणाऱ्यांनी जपून सेवन करावे.
गर्भवती महिलांनी रोज तुळस खाणे टाळावे, कारण याचा हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो.
अतिसेवन केल्यास पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्याची शक्यता सांगितली जाते.
तुळस नैसर्गिक ब्लड थिनर असल्याने सर्जरीपूर्वी किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्यांनी टाळावी.
तुळशीतील काही घटक दातांच्या एनॅमलसाठी हानिकारक ठरू शकतात, विशेषतः रोज चघळल्यास.
काही लोकांमध्ये मळमळ, चक्कर किंवा त्वचेची अॅलर्जी दिसू शकते.