Sameer Amunekar
लघवीमध्ये असणारे बॅक्टेरिया वेळेवर बाहेर न गेल्यास ते वाढू लागतात आणि मूत्रमार्गात संसर्ग (UTI) होण्याची शक्यता वाढते. यामुळे जळजळ, वेदना आणि वारंवार लघवीला जाण्याची तक्रार निर्माण होऊ शकते.
लघवी सतत रोखण्याची सवय लागल्यास मूत्राशयाची स्नायू शक्ती कमी होते, ज्यामुळे भविष्यात लघवी पूर्णतः रिकामी होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
लघवी रोखून ठेवल्यास ती मूत्राशयातून परत वर जाऊ शकते आणि किडनीवर दडपण येते, ज्यामुळे किडनी इन्फेक्शन आणि दगड होण्याची शक्यता वाढते.
लघवी दीर्घकाळ रोखल्यास त्यामधील खनिज पदार्थ क्रिस्टलच्या रूपात साचू लागतात, ज्यामुळे मूत्राशयात खडे तयार होऊ शकतात.
लघवी रोखू नका शक्य तितक्या लवकर लघवीला जाणे हे आरोग्यासाठी आवश्यक आहे. लघवी रोखल्याने मूत्राशय, किडनी आणि मूत्रमार्गावर दुष्परिणाम होऊ शकतात.
लघवी रोखण्याची सवय लागल्यास भविष्यात अनियंत्रित लघवीसारखी समस्या निर्माण होऊ शकते.