Sameer Amunekar
सायकलिंग हे कार्डिओ प्रकारात येते. रोज 20-30 मिनिटं सायकल चालवल्यास हृदय मजबूत होतं, रक्तदाब नियंत्रित राहतो, आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
योगासने फक्त फिटनेससाठीच नाही, तर मानसिक शांतता, लवचिकता आणि एकाग्रतेसाठीही खूप उपयुक्त आहेत.
पोहताना शरीरातील जवळपास प्रत्येक स्नायू वापरले जातात. हात, पाय, पाठ, कोअर, छाती... सर्व काही! त्यामुळे एकाच वेळी स्ट्रेंथ, स्टॅमिना आणि लवचिकता वाढते.
पायऱ्या चढताना शरीराचा झपाट्याने वापर होतो. फक्त 10 मिनिटं पायऱ्या चढणं = 30 मिनिटं वॉकिंग इतका व्यायाम! प्रती मिनिट 8-11 कॅलरीज जळू शकतात – वजन कमी करण्यासाठी बेस्ट
चालणे अगदी सोपं, नैसर्गिक आणि सगळ्यांत कमी त्रासदायक पण सर्वोत्तम व्यायामांपैकी एक आहे. तुमचं वय काहीही असो, चालणं हे फिटनेस सुरू करण्यासाठी सर्वोत्तम स्टेप आहे.
दररोज फक्त 20 मिनिटे वेळ देऊनही तुम्ही शरीर सुपरफिट ठेवू शकता.