Sameer Amunekar
एप्रिल महिन्यात हवामान थोडं गरम होत असलं तरी भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत. जिथे कपल्सना शांत, रोमँटिक आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला मजा येते.
हिमाच्छादित डोंगर, शांत तलाव आणि निसर्गाचं अद्भुत रूप... हे सगळं अनुभवायला तुम्हाला जायचंच असेल तर "काश्मीर"ला जाऊ शकता. इथे प्रत्येक ऋतूमध्ये सौंदर्याची वेगळीच झलक दिसते. कपल्ससाठी ही एक रोमँटिक स्वप्नयात्रा ठरू शकते.
हिमाचलच्या कुशीत वसलेलं एक सुंदर ठिकाण म्हणजे मनाली. इथलं प्रत्येक क्षण रूमानी आहे. कपल्ससाठी खास, शांत, आणि साहसाने भरलेलं हे डेस्टिनेशन नक्कीच एक आठवणीत राहणारी ट्रिप ठरते.
समुद्राच्या लाटांमध्ये प्रेमाचं संगीत ऐकायचं असेल, तर अंदमान तुमच्यासाठी परिपूर्ण आहे. इथली स्वच्छ किनारपट्टी, निळसर पाणी आणि शांत वातावरण कपल्ससाठी स्वर्गासारखं वाटतं.
हिमशिखरांनी वेढलेलं आणि बर्फाने सजलेलं औली हे रोमँटिक कपल्ससाठी एक परफेक्ट ठिकाण आहे.
गोवा फक्त पार्टींसाठी नाही, तर एक रोमँटिक अनुभव येथे मिळतो. इथल्या निवांत बीचेसपासून ते कॅफेमधल्या डेट्सपर्यंत... प्रत्येक क्षण कपल्ससाठी खास बनतो.